“मी आज पुरावा आणलाय”, म्हणत राज ठाकरेंनी भर गर्दीत गठ्ठ्यांचा ढीगच दाखवला; म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या 'सत्याचा मोर्चा'ची चर्चा होती. आज मुंबईत फॅशन स्ट्रीट ते महानगर पालिका भवनापर्यंत मोर्चा निघाला. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत दुबार मतदारांची यादी सादर केली. त्यांनी विविध मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्या सांगितली आणि निवडणुकांमध्ये दुबार मतदार आढळल्यास त्यांना बडवून काढण्याचे आवाहन केले.