लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, एप्रिल महिना संपण्याआधी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेत दरमहा १५०० रुपये दिले जातात. काही महिलांना इतर योजनांमुळे कमी रक्कम मिळते. ३० एप्रिलला निधी वितरीत होण्याची शक्यता आहे.