‘मित्रपक्षांकडूनच टार्गेट’, काकांच्या मदतीला पुतण्या धावला; रोहित पवार म्हणाले, अजितदादा..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना मुरूम उत्खननाची कारवाई रोखण्यासाठी फोन केल्याप्रकरणी टीका होत आहे. विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले असून शिवसेनेने (ठाकरे) त्यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी काकांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे.