‘चार नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई होणार’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला वगळायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असला तरी, या सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शाहांच्या हाती आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण असून, चार मंत्र्यांना बाहेर काढण्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार आणि इतर कारणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, असेही राऊत यांनी सांगितले.