सिंधुताई सपकाळांच्या संस्थेच्या नावे लग्नाळू मुलांची फसवणूक
सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. लग्नाच्या आमिषाने मुलांकडून पैसे उकळले जात आहेत. ममता सिंधुताई यांनी सोशल मीडियावरून आवाहन केले आहे की, अशा अफवांना बळी पडू नका. संस्थेत सध्या लग्नासाठी मुली नाहीत. फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मदत घेतली जाईल. कोणतीही शंका असल्यास संस्थेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.