“उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी पुन्हा हातमिळवणी करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी वाद बाजूला ठेवून एकत्र येणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. सुप्रिया सुळे यांनी दोघांच्या एकत्र येण्याला महाराष्ट्राच्या इतिहासातला सोनेरी दिवस म्हटलं आहे. पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत विचारल्यावर त्यांनी पांडुरंगाची इच्छा असं उत्तर दिलं.