“उद्धव ठाकरे म्हणाले आता निर्णय राज ठाकरेंनी…”; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना 'टाळी' देण्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरेंनीही तत्काळ प्रतिसाद देत टाळीला हाळी देण्याची भाषा केली होती. दोन्ही नेते विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर युतीच्या चर्चा थंडावल्या होत्या. आता पुन्हा या चर्चा सुरु झाल्या आहेत. सुषमा अंधारेंनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी युतीबाबत निर्णय राज ठाकरेंवर सोडला आहे.