नागा चैतन्यनंतर नागार्जुन यांचा धाकटा मुलगा अडकणार लग्नबंधनात
दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्किनेनीने १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेयसी झैनब रावदजीसह साखरपुडा केला. नागार्जुन व अमला अक्किनेनी मोठ्या थाटामाटात मुलाचं लग्न लावणार आहेत. नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना आमंत्रण दिलं आहे. झैनब रावदजी एका नामांकित व्यावसायिक कुटुंबातून असून तिने 'मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज' चित्रपटात काम केलं आहे.