लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवालांचा पत्नीसह ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता केजरीवाल शुक्रवारी, १८ एप्रिलला लग्नबंधनात अडकली. कॉलेजचा मित्र संभव जैन याच्याशी हर्षिताने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दिल्लीतील फाइव्ह स्टार शांगरी-ला इरोस हॉटेलमध्ये भव्य साखरपुड्याने या लग्नसोहळ्याची सुरुवात झाली होती. लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवाल पत्नीसह थिरकताना पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.