अमिताभ बच्चन पत्नी जया व सून ऐश्वर्या रायचं कौतुक का करत नाहीत? म्हणाले, “त्या स्त्रिया…”
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर आपली मतं मांडतात. त्यांनी नुकतंच मुलगा अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपट 'कालिधर लापता'साठी त्याचं कौतुक केलं. एका नेटकऱ्याने त्यांना फक्त अभिषेकचं कौतुक करत असल्याचं म्हटलं, त्यावर अमिताभ यांनी स्त्रियांचा आदर करतो म्हणून सोशल मीडियावर कौतुक करत नाही असं उत्तर दिलं. तसेच, ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.