‘शोले’तलं नाणं प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटाच्या पन्नाशीचा दमदार खणणाट!
शोले चित्रपटातील जयकडे असलेल्या खास नाण्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे शोलेची पन्नाशी. १५ ऑगस्टला शोलेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हे नाणं प्रकाशित केलं आहे. शोले हा कल्ट क्लासिक चित्रपट असून त्यातील संवाद, पात्रं आणि नाण्याचा खणखणाट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. सलीम-जावेद यांची स्क्रिप्ट आणि दिग्गज कलाकारांनी शोलेला अजरामर केलं आहे.