“तोंडावर थुंकायचा, शिवीगाळ आणि…”; अभिनेत्रीने नवऱ्याच्या छळाबाबत काय सांगितलं होतं?
हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा छळ झाल्याची घटना ताजी असतानाच, अभिनेत्री आरजू गोवित्रीकरनेही तिच्या नवऱ्याने केलेल्या छळाची कहाणी समोर आली आहे. आरजूने २०१० मध्ये सिद्धार्थ सबरवालशी प्रेमविवाह केला होता, पण त्यानंतर सात वर्षे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. सिद्धार्थने दारूच्या नशेत मारहाण केली, शिवीगाळ केली आणि विवाहबाह्य संबंध ठेवले. अखेर २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.