३ महिन्यांपासून बेपत्ता अभिनेत्याचा शहरात सापडला मृतदेह, कुटुंबीय म्हणाले…
जपानी अभिनेता मिझुकी इटागाकी, जो २४ वर्षांचा होता, तीन महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह टोकियोमध्ये सापडला आहे. 'बॉय बँड' M!LK चा माजी सदस्य असलेल्या मिझुकीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची दु:खद बातमी दिली आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे तो बेपत्ता झाला होता. टोकियो पोलिसांनी त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे.