ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, चिमणराव मालिकेतील ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. चिमणराव मालिकेतील गुंड्याभाऊ या पात्रामुळे ते प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. बाळ कर्वे यांनी विविध नाटकांमध्ये अभिनय केला होता आणि त्यांच्या गुंड्याभाऊ पात्राने लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. त्यांनी 'किलबिल बालरंगमंच' स्थापन केली आणि बालनाट्ये बसवली.