एका युगाचा अंत! MTV Music चॅनेल्स लवकरच होणार बंद, संगीतप्रेमी भावुक
MTV हे जगप्रसिद्ध म्युझिक चॅनल ३१ डिसेंबर २०२५ रोजी बंद होणार आहे, अशी घोषणा पॅरामाउंट ग्लोबलने केली आहे. यामध्ये MTV Hits, MTV 80s, आणि MTV 90s चॅनेल्सचा समावेश आहे. डिजिटल युगातील बदलांमुळे आणि यूट्यूब, स्पॉटिफायसारख्या माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील MTV चॅनेलच्या भवितव्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.