“हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही”, मालेगाव प्रकरणी शरद पोंक्षेंचं विधान; म्हणाले…
२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल लागला असून सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया देत हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह खोटा असल्याचे सांगितले. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.