कामातून ब्रेक घेत छाया कदम यांनी गाठलं थेट कोकण, खास क्षण केले शेअर; साधेपणाचं कौतुक
मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी कामाच्या व्यग्रतेतून वेळ काढत कोकणातील त्यांच्या मूळ गाव धामापुरला भेट दिली. त्यांनी या भेटीचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडीओंमध्ये त्या घराच्या उंबरठ्यावर बसून निसर्गाचा आनंद घेताना, वाहिनी रांगोळी काढताना, गावच्या मंदिराची झलक, पारंपरिक शिरवाळ्याचा आस्वाद घेताना आणि 'मन तळ्यात मळ्यात' गीत गाताना दिसतात. त्यांच्या साधेपणाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.