“मी ४५० कोटींचा सिनेमा करणारच…”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले…
मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटातून शेतकरी आत्महत्येचा गंभीर विषय मांडला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ४५० कोटींचा सिनेमा करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, चांगला विषय आणि मोठं बजेट असलेला सिनेमा देशभरात प्रदर्शित केल्यास मोठी कमाई होऊ शकते. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे.