‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील सिद्धार्थ बोडकेचा अभिनय पाहून मराठी अभिनेत्याला आलं रडू
अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातील अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रीमियर सोहळ्यात अभिनेता नयन जाधव सिद्धार्थचा अभिनय पाहून भावुक झाला. त्यानं सिद्धार्थला मिठी मारली आणि अश्रू ढाळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी दोन्ही कलाकारांचं कौतुक केलं आहे. "सिद्धार्थला मिळालेला हाच खरा पुरस्कार आहे" अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.