“सहनशक्तीचा अंत होणार आणि…”, हेमंत ढोमेची पोस्ट; गावात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय रोहन बोंबे याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे कार्यालय आणि वाहन जाळले. मराठी अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या घटनेबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सरकारकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.