‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं ‘इतक्या’ कोटींचं घर
मुंबईत घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं, आणि कलाकारही त्याला अपवाद नाहीत. बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावतनं अंधेरीत १० कोटींचं घर खरेदी केलं आहे. जयदीप आणि त्याची पत्नी ज्योती हुडा यांनी हे घर खरेदी केलं आहे. जयदीप मूळचा हरियाणाचा असून, तो अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये झळकला आहे. 'महाराज' चित्रपटातील भूमिकेमुळे तो चर्चेत आला होता.