कपिल शर्माच्या कॅनडामधील नवीन कॅफेवर गोळीबार, व्हिडीओही आला समोर
कॅनडातील सरे (ब्रिटिश कोलंबिया) येथे कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी नुकतेच सुरू केलेल्या 'कॅप्स कॅफे'वर गोळीबार झाला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. सध्या स्थानिक पोलिस आणि तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.