‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पोहोचला कोकणात, पहिल्यांदाच केली भातलावणी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने कोकणात गेला आहे. निखिलने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कोकण प्रवासाची सफर घडवली आहे. त्याने प्रसाद गावडेच्या गावी जाऊन भातलावणी केली आणि कोकणातील निसर्गाचा आनंद घेतला. निखिलच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्याच्या साधेपणाचंही कौतुक होत आहे.