नणंद-भावजयीची एकाच दिवशी एमेकांविरोधात तक्रार, रुपाली चाकणकरांनी नेमकं काय सांगितलं?
हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांचा छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिने कुटुंबातील सदस्यांचे काळे चेहरे उघड केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, वैष्णवीची नणंद करिष्मा आणि जाऊ मयुरी यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता, असे चाकणकर म्हणाल्या.