“तिने धर्मांतर करायला सांगितलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्याने गौहर खानबद्दल केलेला खुलासा
अभिनेता कुशाल टंडन आणि गौहर खान यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपलं स्थान निर्माण केलं आहे. २०१३ मध्ये बिग बॉसमध्ये भेटलेल्या या जोडप्याने नंतर रिलेशनशिपमध्ये राहून प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, वर्षभरानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. कुशालने धर्माच्या मुद्द्यावरून ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. गौहरने नंतर जैद दरबारशी लग्न केलं आणि आता ती दुसऱ्यांदा गरोदर आहे.