५ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, थाटामाटात केलेलं लग्न
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सोन्या अयोध्या हिने पती हर्ष समोर्रेपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. 'कसौटी जिंदगी की २' मधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी सोन्या आणि हर्ष यांचे लग्न २०१९ मध्ये जयपूरमध्ये थाटामाटात झाले होते. ऑक्टोबर २०२४ पासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. सध्या सोन्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.