‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? प्रतिक्रिया देत म्हणाली…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका आहे. अलीकडेच मालिकेत नवीन कुटुंबाची एन्ट्री झाली. अभिनेत्री अंबिका रांजणकरने मालिका सोडल्याच्या चर्चांना खोटं ठरवत, ती काही वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असल्याचे सांगितले. अंबिका गेली १७ वर्षे कोमल हाथीची भूमिका साकारत आहे. तसेच मालिकेत नवीन पात्रे येणार असल्याने प्रेक्षकांना नवीन वळण पाहायला मिळेल.