Bigg Boss 19 : “इतकं सगळं करूनही…”, सलमान खानवर नीलम गिरी नाराज; म्हणाली, “खूप वाईट…”
'बिग बॉस'च्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने नीलम गिरीला जेवण न बनवण्याबद्दल दम दिला, ज्यामुळे ती नाराज झाली. तिने तान्या मित्तलला सांगितले की, तिचे कधीच कौतुक होत नाही. सलमानने मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अभिषेक बजाज, प्रणीत मोरे आणि अशनूर कौर यांच्या खेळाचे कौतुक केले. याच भागात सलमानने अमाल मलिकवर झालेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली.