“घराबाहेर जायची परवानगी नव्हती आणि…”, क्रिकेटपटूच्या बहिणीचं वक्तव्य; म्हणाली…
टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या १९व्या पर्वात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. घरातील इतर स्पर्धकांशी गप्पा मारताना तिने आपल्या वडिलांच्या IPS अधिकारी होण्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले. वडिलांच्या कठोर शिस्तीमुळे तिला मुलींसारखे वागण्याची परवानगी नव्हती. मालती फेमिना मिस इंडिया २०१४च्या अंतिम फेरीत पोहोचली होती आणि 'मिस फोटोजेनिक' किताब जिंकला होता. ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे.