प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा बांधली लग्नगाठ, नोंदणी पद्धतीने केला विवाह, व्हिडीओ केला शेअर
टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडपं प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी लग्नाच्या ६ वर्षानंतर १९ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. आता त्यांनी पुन्हा एकदा नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. युविकाने यूट्यूबवर व्लॉग शेअर करत ही माहिती दिली. 'बिग बॉस ९'पासून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. त्यांच्या लेकीचं नाव 'एक्लीन' आहे.