‘ऑपरेशन सिंदूर’च्या अधिकारी ‘केबीसी’च्या मंचावर; गणवेशासहित सहभागी होणं योग्य की अयोग्य?
'कौन बनेगा करोडपती'च्या १७व्या सीझनच्या स्वातंत्र्यदिन विशेष भागात 'ऑपरेशन सिंदूर'च्या शूर महिला अधिकारी सहभागी होणार आहेत. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कमांडर प्रेरणा देवस्थळी या भागात येणार आहेत. या भागावर काहींनी लष्कराच्या अधिकाऱ्यांचा प्रचारासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही यावर टीका केली आहे.