रोहित आर्यबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, पवईतील घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच घेतलेली भेट
मुंबईतल्या पवई येथील शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रोहितनं १७ मुलं आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून जाळण्याची धमकी दिली होती. मराठी अभिनेता आयुष संजीवनं सोशल मीडियावर रोहितबरोबरच्या भेटीची पोस्ट शेअर केली. आयुषनं दोन दिवसांपूर्वीच रोहितला भेटून आगामी चित्रपटासाठी ऑफर मिळाल्याचं सांगितलं.