रुपाली भोसलेच्या नव्या गाडीचा झाला अपघात, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…
लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या नव्या मर्सडीज गाडीचा अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती शेअर केली असून, गाडीच्या बोनटचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. रुपालीने 'अपघात झाला, वाईट दिवस' असे लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे तिचे चाहते काळजीत आहेत. रुपाली सध्या 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 