“लाज वाटायला हवी…”, ठाणे-घोडबंदर रस्त्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली…
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती अत्यंत वाईट असून, अनेक सेलिब्रिटींनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री विदिशा म्हसकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिने नितीन गडकरी, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष देण्याची विनंती केली आहे.