‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अंजलीची ‘सब टीव्ही’वरील ‘या’ मालिकेत एन्ट्री; म्हणाली…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता आता 'सब टीव्ही'वरील 'इत्तीसी खुशी' या नवीन मालिकेत हेतलच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहानं २०२० मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून एक्झिट घेतलेली. नवीन भूमिकेबद्दल नेहा म्हणाली की, 'सब टीव्ही' तिच्या घरासारखं आहे आणि तिला वेगळं, उत्साही पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे.