१५ वर्षांनंतरही ‘अप्सरा आली’ची जादू कायम; लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्रींचं नृत्यसादरीकरण
२०१० साली आलेला 'नटरंग' हा मराठी सिनेमा रवी जाधवने दिग्दर्शित केला असून, अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 'अप्सरा आली' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून, चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.