AI फोटोमुळं गावात जातीय तणाव; ब्राह्मण व्यक्तीचे पाय धुवून समाजाची माफी मागायला लावली
मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात एआय जनरेटेड फोटोमुळे जातीय तणाव निर्माण झाला आहे. पुरुषोत्तम कुशवाह या तरुणाने अनुज पांडेची खिल्ली उडवणारा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामुळे गावात संतापाची लाट उसळली. ब्राह्मण समुदायाने कुशवाहाला पांडेचे पाय धुण्यास आणि माफी मागण्यास भाग पाडले. पोलिसांनी याची दखल घेतली असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.