“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर मनसेवर होतेय टीका
ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशनवर झालेल्या किरकोळ वादानंतर मनसे कार्यालयात एका अमराठी महिलेला माफी मागण्यास सांगितले गेले. माफी मागूनही तिच्या कानशिलात लगावण्यात आली. हा व्हिडीओ मनसे पदाधिकारी विनायक बिटला यांनी फेसबुकवर शेअर केला, ज्यावर काहींनी टीका केली आहे.