जगभरातील सर्वच मोबाईल कंपन्यांची अ‍ॅपलच्या सर्वच उत्पादनांवर बारीक नजर असते. अ‍ॅपलच्या हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टिम दोन्हीमध्ये होणाऱ्या अनेक बदलांचा थेट बाजारपेठेवरच परिणाम होतो. आता अ‍ॅपलने ios 16.1 ची पब्लिक बीटा आवृत्ती उपलब्ध करून दिली आहे. या आधी हे नवे व्हर्जन फक्त डेव्हलपर्ससाठी उपलब्ध होते. तुमचा आयफोन बीटा १६.१ व्हर्जनवर असेल तर ‘सॉफ्टवेअर अपडेट’ सेक्शनमध्ये तुम्हाला ‘अपडेट’ पाहायला मिळेल. या नव्या अपडेटमध्ये नवीन सुविधा मर्यादित असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Google Pixel 7, Pixel 7 Pro ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद; काही तासातच स्टॉक संपला!

बॅटरी पर्सेंटेज दिसणार
अखेरीस प्रतीक्षा संपली असून आयओएस १६ मध्ये बॅटरी पर्सेंटेज दिसणार आहे. यापूर्वीही काही व्हर्जनमध्ये ते दिसत होते. मात्र अक्षरातील त्याचा आकार लहान होता. अक्षराचा आकार वाढविण्यात आल्याने आता ते सुस्पष्ट दिसते आहे, हा बदल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. यापूर्वी iPhone XR, 12 mini, and 13 mini या मॉडेल्समध्ये बॅटरी पर्सेंटेज दिसत नव्हते. मात्र आता iOS 16.1 नव्या अपडेटमध्ये या मॉडेल्समध्येही बॅटरी पर्सेंटेज सुस्पष्ट दिसेल.

आणखी वाचा : तुमचं ‘आधार कार्ड’ दहा वर्ष जुना झाला असेल तर…आधारकार्ड धारकांसाठी UIDAI ची महत्त्वाची सूचना

लाइव्ह अ‍ॅक्टिविटिज
लाइव्ह अ‍ॅक्टिविटिजमध्ये आता विविध अ‍ॅप्सवरील रिअल टाइम बाबी डायनॅमिक नोटिफिकेशनच्या स्वरूपात दिसतील. यापूर्वी डेव्हलपर व्हर्जन आययोएस १६ मध्ये उपलब्ध असलेले हे फीचर आता बीटा पब्लिक व्हर्जनमध्येही देण्यात आले आहे. यामुळे आता उबर अ‍ॅपच्या नोटिफिकेशन्समध्ये गाडी किती वेळात येणार, किती वेळात पोहोचणार आदी माहिती तुम्हाला थेट लॉक स्क्रीनवरच दिसेल. तसेच स्पोर्टस् अ‍ॅप वापरणाऱ्यांच्या लॉक स्क्रीनवरच मॅचचा लाइव्ह स्कोअरही झळकेल.

आणखी वाचा : अरे वा! Pixel 6a, Pixel 7 स्मार्टफोन्सना देशात लवकरच मिळणार 5G अपडेट

फिटनेस प्लस
आजवर अ‍ॅपलचा ‘फिटनेस प्लस’ हा वर्कआऊट प्रोग्रॅम केवळ अ‍ॅपल वॉचवरच उपलब्ध होता. मात्र आता या आयओएस १६.१ च्या नव्या अपडेटमध्ये हा प्रोग्रॅम तुम्हाला आयवॉचशिवाय फॉलो करता येणार आहे. अ‍ॅपल वॉचवर तुमचे फिटनेस डिटेल्स फॉलो करण्याची सुविधा आहे. ती मात्र केवळ वॉचवरच असल्याने ती इथे मिळणार नाही. मात्र प्रोग्रॅम नक्कीच फॉलो करता येईल. फिटनेस प्लस सध्या भारतात उपलब्ध नाही. मात्र येणाऱ्या काळात उपलब्ध होईल.

आणखी वाचा : लॅपटॉप, संगणकाला जबरदस्त पर्याय, मायक्रोसॉफ्टचा SURFACE PRO 9 5G सह लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर

चार्जिंगसाठी स्वच्छ ऊर्जा
सध्या चर्चा सुरू आहे ती वातावरण बदलाची. आणि त्यास कारणीभूत ठरलेला महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बन आणि त्याचे वाढलेले प्रमाण. पर्यावरण रक्षणाच्या या मोहिमेत हातभार म्हणून अ‍ॅपलने ‘क्लीन एनर्जी चार्जिंग’ हे फीचर सुरू केले आहे. कमीत कमी कार्बन उत्सर्जन करून निर्माण केलेली ऊर्जा उपलब्ध असताना या फीचरमध्ये चार्जिंग केले जाते. Settings > Battery > Battery Health & Charging > Clean Energy Charging या सेटिंगमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. त्याचा कोणताही परिणाम तुमच्या उपकरणाच्या वापरावर होत नाही

आणखी वाचा : Moto G72 भारतात विक्रीसाठी उपलब्ध; किंमत फक्त…

व्हॉल्यूम गेश्चर एअरपॉडस् प्रो टू
एअरपॉडस् प्रो टू AirPods Pro 2 मध्ये देण्यात आलेल्या गेश्चरच्या सुविधेमुळे अनेकजण हैराण झाले आहेत. कारण अनेकदा लहान- मोठ्या हालचालींमधूनही गेश्चर्स कार्यरत होतात आणि आवाज कमी- अधिक होतो. आता आयओएस १६.१ मध्ये तुम्हाला गेश्चर्स ऑफ करण्याची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे हैराण होणे टळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple ios 16 1 news five features beta public version battery percentage fitness plus live activities vp