देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नुकतीच ५जी सर्विस लाँच केली आहे. आता google Pixel 6a आणि नवीन Pixel 7 स्मार्टफोन्सनाही लवकरच एक नवीन अपडेट मिळणार आहे. जे भारतातील या उपकरणांवर 5G नेटवर्क सक्षम करेल. Pixel 6a आणि नवीन Pixel 7 फोन भारतात 5G ला सपोर्ट करतील. कंपनीने पुष्टी केली आहे की, ते देशातील पिक्सेल उपकरणांवर 5G कार्यक्षमतेला परवानगी देण्यासाठी भारतीय दूरसंचार ऑपरेटर्ससोबत सक्रियपणे काम करत आहेत.
कंपनीने सांगितले की, Google ने यावर्षी भारतात अनेक Pixel फोन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये Pixel 6a मिड-रेंज आवृत्तीचा समावेश आहे. Pixel 7, 7 Pro आणि Pixel 6a ही 5G सक्षम उपकरणे आहेत. हे Pixel फोन देशात 5G कधी चालवू शकतील, याबद्दल Google ने ठोस टाइमलाइन दिलेली नाही.




आणखी वाचा : IPHONE युजरना ५ जी सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार, ‘या’ महिन्यात मिळणार सॉफ्टवेअर अपडेट
Pixel 6a फिचर्स
गुगलने आपल्या या फोनमध्ये स्वतः बनवलेले गुगल टेन्सर प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाची स्क्रीन दिली आहे. ज्यात फुल एचडी प्लस १०८० x २४०० पिक्सेलचे रिझॉल्यूशन दिले आहे. यानंतर ६० HZ चे रिफ्रेश रेट सुद्धा या फोनमध्ये दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा फॉर्मेट दिले आहे. यात १२.२ मेगापिक्सलचा मेन रियल कॅमेरासोबत १२ मेगापिक्सलचा दुसरा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. यासोबत फ्लॅश लाइट सुद्धा उपलब्ध दिले आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे.
Xiaomi, Realme आणि OnePlus सारख्या ब्रँड्सनी आधीच भारतात 5G नेटवर्कला सपोर्ट करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या काही मॉडेल्सना अद्याप हँडसेट मेकरकडून OTA अपडेट मिळालेले नाहीत जे त्यांच्या फोनवर 5G सक्षम करेल.
Pixel 7 मालिका भारतात आज १३ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध
कंपनीने नवीन Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन्ससह तीन वर्षांत प्रथमच देशात आपले पहिले पिक्सेल फ्लॅगशिप सादर केले आहेत. नवीन Pixel 7 मालिका भारतात ५९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर झाली आहे आणि तुम्हाला ती सिंगल १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये मिळेल. Pixel 7 मालिका भारतात आज १३ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे .