Premium

इन्स्टाग्रामने स्टोरी आयकॉनची साइज वाढवली, युजर्स मात्र संतापले; तुमच्या इन्स्टाग्रामवरही दिसतो का हा बदल?

आता इन्स्टाग्रामने एक छोटा बदल केला आहे, मात्र अनेक युजर्सला हा बदल आवडलेला नाही.

instagram update the size of the story icons
(Photo : Twitter)

इन्स्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक इन्स्टाग्रामचा वापर करतात. इन्स्टाग्राम हे ॲपच्या लूक आणि फीचरमध्ये अनेक बदल करत असतो. आता इन्स्टाग्रामने एक छोटा बदल केला आहे, मात्र अनेक युजर्सला हा बदल आवडलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक युजर्स सांगतात की त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरी फीचरच्या आयकॉनचा साइज अचानक मोठा दिसत आहे. स्टोरी आयकॉनचा साइज मोठा केल्यामुळे अनेक युजर्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : WWDC 2023: iOS 17 मध्ये आयफोन वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

इन्स्टाग्राम नवनवीन अपडेट आणत असतो, मात्र ही अपडेट इन्स्टाग्राम युजर्सला आवडली नाही. अनेक युजर्स तर ट्विटरवर नाराजी व्यक्त करत जुनी स्टोरी आयकॉन साइज परत आणा, अशी मागणी करत आहे.


एक युजर लिहितो, “हे मला मूर्ख बनवत आहे. एक तर मी वेडा झालो किंवा इन्स्टाग्रामने स्टोरी आयकॉनची साइज अपडेट केली? मी माझ्या आजीचा फोन पाहत असल्याचे मला वाटले.” तर दुसरा युजर लिहितो की “हाय इन्स्टाग्राम, प्लीज स्टोरीची साइज परत आणा. हे विचित्र दिसत आहे.”

हेही वाचा : तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा; भारतातील ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

युजर्सने स्टोरी आयकॉनच्या साइजवर दाखवलेली नाराजी चर्चेत आहे. या प्रकरणातील अनेक ट्वीट व्हायरल होत आहे. आता मात्र इन्स्टाग्राम स्टोरी आयकॉनची साइज परत आणेल का, हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 11:47 IST
Next Story
जुलै महिन्यात होणार सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट, ‘हे’ दोन भन्नाट फोल्डेबल फोन लॉन्च होण्याची शक्यता