Mukesh Ambani Jio launches Cheapest prepaid recharge plan With Additional Data Watch IND vs BAN Highlights FIFA world Cup Online | Loksatta

अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च

Reliance JIO च्या या भन्नाट प्लॅनसह नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सहित Sony Liv सारखे ऍप आपल्याला 4K रिझोल्यूशनसहित व्हिडीओचा आनंद घेऊ देतात.

अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च
अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट (फोटो: ट्विटर)

IND vs BAN ODI, फिफा विश्वचषक पाहण्याच्या निमित्ताने अलीकडे अनेकदा इंटरनेट पॅक वेळेच्या आधीच संपतोय का? मॅच चांगल्या इंटरेस्टिंग वळणावर आलेली असताना अचानक अडथळा आला की काय करू आणि काय नको अशी परिस्थिती तुमचीही होत असेल ना? मग या सगळ्या प्रश्नावर रिलायन्स जिओने एक भन्नाट प्लॅन आणला आहे. खास FIFA विश्वचषकासाठी रिलायन्सने आपला ३०१ रुपयांचा प्लॅन हा कमी किमतीत ऑफर केला आहे. तसेच या प्लॅनचा वापर करून मूळ रिचार्ज प्लॅनसहित अधिक वेगवान 4G इंटरनेटचा फायदा घेऊ शकता. नेमका काय आहे प्लॅन, चला तर जाणून घेऊयात…

काय आहे रिलायन्स जिओ प्लॅन?

जिओने आपला ३०१ रुपयांचा प्लॅन २२२ रुपयात उपलब्ध करू दिला आहे. ३० दिवसांच्या वैधतेसह ५० जीबी 4G इंटरनेटसह हा प्लॅन येतो. रिलायन्स जिओच्या या भन्नाट प्लॅनसह नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सहित Sony Liv सारखे ऍप आपल्याला 4K रिझोल्यूशनसहित व्हिडीओचा आनंद घेऊ देतात. हा प्लॅन आपण आपल्या स्मार्टफोनवर तर वापरू शकताच पण त्यासह लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीला हॉटस्पॉट जोडूनही इंटरनेट वापरता येते.

कसा वापराल रिलायन्सचा २२२ रुपयांचा प्लॅन?

जिओचा फिफा वर्ल्ड कप रिचार्ज प्लॅन वापरण्यासाठी वापरकर्त्याकडे बेस प्लॅन असणे आवश्यक आहे आणि बेस प्लॅनवर उपलब्ध असलेल्या 4G डेटाची दैनिक मर्यादा संपल्यानंतरच या प्लॅनमधील डेटा वापरता येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या जिओ सिमवर २९९ रुपयांचा रिचार्ज केला असेल, तर तुम्ही बेस प्लानमधून 2GB डेटा पूर्ण वापरल्यानंतर हा अतिरिक्त 50GB डेटा वापरू शकता.

हे ही वाचा<< 12,500 रुपयात मिळतोय 44 हजारांचा Google Pixel 6a! फ्लिपकार्टच्या ऑफरचा कसा फायदा घ्याल?

फुटबॉलप्रेमींसाठी खास तयार करण्यात आलेल्या या जिओ प्लॅनमध्य कोणत्याही डेटा कॅपशिवाय संपूर्ण 50GB डेटा ऑफर केलाजातो. ज्यांना इंटरनेटवरून मोठ्या फाइल्स डाउनलोड करायच्या असतील किंवा वीकेंडला सिरीज पाहायच्या असतील त्यांना हा प्लॅन अगदी फायद्याचा ठरू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:39 IST
Next Story
अपघात टाळा पैसेही वाचवा! Google चे ‘हे’ अ‍ॅप तुमची कार स्पीड लिमिट क्रॉस करताच देईल इशारा