scorecardresearch

12,500 रुपयात मिळतोय 44 हजारांचा Google Pixel 6a! फ्लिपकार्टच्या ऑफरचा कसा फायदा घ्याल?

Google Pixel 6a आपल्याला ५ हजार रुपयांच्या विना कॉस्ट ईएमआयसह सुद्धा हा फोन खरेदी करता येऊ शकतो.

12,500 रुपयात मिळतोय 44 हजारांचा Google Pixel 6a! फ्लिपकार्टच्या ऑफरचा कसा फायदा घ्याल?
12,500 रुपयात मिळतोय 44 हजारांचा Google Pixel 6a! (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Google Pixel 6a Amazing Offer: गुगलने काही दिवसांपूर्वीच Google Pixel 6a प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला होता. तेव्हापासून या फोनला जबरदस्त डिमांड आहे. स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा आणि त्याचा डिस्प्ले आणि परफॉर्मेंस जबरदस्त आहे. आता याच फोनची किंमतही ग्राहकांना खुश करत आहे. फ्लिपकार्टवर गुगलच्या नव्याकोऱ्या पिक्सेल 6a वर जवळपास ३० हजारांची मोठी सूट मिळत असल्याचे समजतेय. गुगल अँड्रॉइड फोन पिक्सेल 6a साठी फ्लिपकार्ट व अमेझॉन दोन्ही ठिकाणी ऑफर्स तपासून पाहू शकता. याबाबत सविस्तर माहिती व गूगल पिक्सेल 6a ची वैशिष्ट्य आता आपण जाणून घेऊयात..

Google Pixel 6a: फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर

गुगलचा Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच झाल्यावर या स्मार्टफोनची किंमत ४३,९९९ रुपये इतकी होती. आता हा स्मार्टफोन तुम्ही १२ हजार ४९९ मध्ये खरेदी करू शकता. गूगल पिक्सेल 6a हा सहा जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजसह चार रंगात उपलब्ध आहे. पेस्टल शेड्स असल्याने हा फोन तरुणाईला जास्त आकर्षित करत आहे.

फ्लिपकार्टने गूगल पिक्सेलवर २९% सूट घोषित केल्यावर या फोनची मूळ रक्कम कमी होऊन ३० हजार रुपये ९९९ इतकी झाली होती. जर तुमच्याकडे उत्तम स्थितीत असलेला जुना फोन असेल तर आपण एक्स्चेंज ऑफरचा सुद्धा लाभ घेतला आहे. तुम्ही जुन्या फोनसाठी पूर्ण १८ हजार ५०० रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळवून अवघ्या १२ हजार ५९९ रुपयात हा गूगल पिक्सेल 6a खरेदी करू शकता.

याशिवाय जर आपण Axis बँकचे कार्ड वापरून पेमेंट करणार असाल तर आपळ्याला ५ टक्के सूट मिळू शकते. आपल्याला ५ हजार रुपयांच्या विना कॉस्ट ईएमआयसह सुद्धा हा फोन खरेदी करता येऊ शकतो.

Google Pixel 6a ची वैशिष्ट्य

Google Pixel 6a चे डिझाइन सीरिजचे इतर मॉडेल्स Pixel 6 आणि Pixel 6 Pro प्रमाणेच आहे. यात मेटल फ्रेमसह पुढील बाजूला गोरिल्ला ग्लास आणि मागील बाजूला प्लास्टिक पॅनेल दिले आहे. फोनला वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसाठी आयपी ६७ सर्टिफिकेशन मिळाले आहे. डिस्प्लेबद्दल सांगायचे तर यात ६.१ इंच फुलएचडी+ OLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.

हे ही वाचा<< iphone झाला स्वस्त, JBL, Boat वरही मोठी सूट; नोव्हेंबर अखेरीस येणारा ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ आहे तरी काय?

यात Google Tensor चिपसेटसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा दिला असून, यात एफ/१.७ अपर्चर आणि OIS सह १२.२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १८ वॉट वायर्ड चार्जिंगसह ४४०० एमएएच बॅटरी दिलेली आहे. मोबाईलची बॅटरी ही २४ तासांचा बॅकअप देते. याशिवाय, स्टीरियो स्पीकर, ऑलवेज ऑन डिस्प्ले, ५जी कनेक्टिव्हिटी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, ड्यूल माइक आणि एचडीआर सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:52 IST

संबंधित बातम्या