वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत ननवीन स्मार्टफोन्स भारतासह जागतिक बाजारामध्ये लॉन्च कर असते. नुकताच वनप्लस कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट (OnePlus Nord CE 4 Lite) २४ जून रोजी लाँच होणार आहे. लाँच करण्यापूर्वी कंपनीने काही फीचर्सची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये फायजी, वायफाय, ब्ल्यूटुथ, 5.2, GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट आहे. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्डचा पर्याय आहे.चला तर नवीन स्मार्टफोनच्या डिस्प्ले, सॉफ्टवेअर, कॅमेरा, बॅटरी, चार्जिंग याबद्दल लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. डिस्प्ले (Display) : वनप्लस कंपनी अखेर AMOLED पॅनेलवर स्विच करत आहे. वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED आहे. ब्राइटनेस २,१०० निट्स , तर फोनला एक्वा टच देखील मिळत आहे. कंपनी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच फुल HD डिस्प्ले देऊ शकते.

२. कॅमेरा (Camera) : वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी OIS सह ५० मेगापिक्सेल, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, सोनी एलव्हायटी-६०० मेन सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे

हेही वाचा…गुगलकडून मराठीला मोठा मान; सुंदर पिचाई यांची मोठी घोषणा, आता जेमिनी करून देणार तुमची ‘ही’ कामं; एकदा पाहाच

३. बॅटरी, चार्जिंग (Battery, charging) : वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट स्मार्टफोनमध्ये ८० डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह ५,५०० एमएएच बॅटरी आहे. 5W रिव्हर्स चार्जिंगसाठी एक पर्याय देखील आहे. म्हणजेच तुम्ही डिव्हाइस चार्ज करण्यासाठी फोनचा पॉवर बँक म्हणून वापर करू शकता.

४. प्रोसेसर (Processor) : वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 बरोबर येईल ; जे एक ग्लोरिफाईड स्नॅपड्रॅगन ६९५ जी प्रोसेसरसह असेल.

५. सॉफ्टवेअर (Software): वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईट स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटसह उपलब्ध असेलच. पण, हे आउट-ऑफ-द-बॉक्स अँड्रॉइड 14 आधारित नवीनतम ऑक्सिजन OS सह येऊ शकते.तर अशा जबरदस्त फीचर्स आणि फास्ट चार्जिंगसह तुम्ही हा स्मार्टफोन २४ जून नंतर खरेदी करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The oneplus nord ce 4 lite is likely to be priced below twenty thousand read design top specs features price india launch date asp