WhatsApp New Feature Coming Soon : आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच भारतात मेटाचा एआय चॅटबॉट काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर या अ‍ॅप्सवर हा चॅटबॉट वापरता येऊ शकतो. एआय चॅटबॉटला काही विचारायचे असेल तर आपल्याला एखादा मेसेज टाईप करावा लागतो किंवा फोटो त्या चॅटमध्ये जाऊन तिथे उपलोड करावा लागत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, आता मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Feature) एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे युजर्सना त्यांचे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ मेटा एआयवर फॉरवर्ड करणे शक्य होणार आहे. सध्या युजर्स मेटा एआयवर मेसेज किंवा फोटो थेट फॉरवर्ड करू शकत नव्हते. पण, या फीचर्ससह युजर्सना मेटा एआयच्या चॅटमध्ये मेसेज कॉपी-पेस्ट करण्याची गरज भासणार नाही. तो मेसेज किंवा फोटो अथवा व्हिडीओ थेट एआय चॅटबॉटवर सहजपणे फॉरवर्ड करू शकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Feature) शेअरिंग अनुभव आणखी वाढवण्यासाठी नवीन फीचर आणून युजर्सच्या सोयी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ‘नवीन अपडेटसाठी धन्यवाद व्हॉट्सअ‍ॅप.’ आम्हाला दिसले की, व्हॉट्सअ‍ॅप मेटा एआयवर मेसेज आणि फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करण्याच्या फीचरवर काम करत आहे, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo, म्हणाली.

आता कॉपी-पेस्ट करण्याची गरज नाही!

अहवालानुसार, मेटा-मालकीचे ॲप फॉरवर्डिंग प्रक्रियेदरम्यान मेटा एआयसाठी फॉरवर्ड केलेल्या कंटेंटमध्ये अधिक संदर्भ जोडण्याचा पर्याय प्रदान करेल. कंटेंट फॉरवर्ड केल्यानंतर युजर्स मेटा एआयला विचारू इच्छित असलेले विशिष्ट प्रश्न किंवा क्वेरी इनपूट करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर मेटा एआय अचूक आणि वैयक्तिकृत प्रतिसाद देण्यास मदत करते, त्यामुळे मेटा एआय युजर्सचा हेतू अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते आणि अधिक उपयुक्त माहिती प्रदान करू शकते.

नवीन फॉरवर्डिंग फीचर्स युजर्सचा वेळ वाचविण्यात मदत करणार आहे, कारण यामुळे मेटा एआयच्या चॅटमध्ये तुम्हाला मेसेज कॉपी आणि पेस्ट करण्याची गरज नाही. हे फीचर सुविधा वाढवेल आणि युजर्सना आवश्यक असलेली माहिती देईल. हे फीचर काही दिवसांत सर्व युजर्ससाठी अपडेट करण्यात येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp new feature will soon allow users to forward photos videos and messages to meta ai asp