व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वेबशी चांगले परिचित असतील. कार्यालयीन कामकाजादरम्यान याचा वापर केला जातो. हे प्लॅटफॉर्म कामाच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अधिक सुलभ करते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सअ‍ॅप वेबवर आणखीही अनेक आश्चर्यकारक फीचर्स आहेत, ज्यांची फार कमी वापरकर्त्यांना माहिती आहे. आज आपण व्हॉट्सअ‍ॅप वेबशी संबंधित काही शॉर्टकट जाणून घेणार आहोत जे खूप उपयुक्त असतील आणि ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणे अधिक सोपे जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबवर चॅट अर्काइव्ह करायचे असल्यास Ctrl + Alt + Shift + E बटण दाबा. या कमांडमुळे तुमचे चॅट अर्काइव्ह केले जातील.

एकाच वेळी दहा डिव्हाइसवर करता येणार लिंक; जाणून घ्या Whatsappचे नवे जबरदस्त फीचर्स

  • कधीकधी आपल्याला चॅट पिन करण्याची गरज वाटते. तुम्हालाही चॅट पिन करायचे असल्यास Ctrl + Alt + Shift + P बटण दाबा.
  • कधीकधी आपल्याला अचानक व्हॉट्सअ‍ॅपवर विशिष्ट चॅटची गरज भासते. ते मॅन्युअली शोधण्यासाठी आम्हाला खाली स्क्रोल करावे लागते, परंतु हवे असल्यास शॉर्टकट कमांडने देखील आपण ते शोधू शकतो. यासाठी तुम्हाला Ctrl + Alt + Shift + F बटण दाबावे लागेल.
  • तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन नको असताना तुम्ही चॅट म्यूट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला Ctrl + Alt + Shift + M बटण दाबावे लागेल.
  • व्हॉट्सअ‍ॅपवरील अशा चॅट्स आपण वेळोवेळी डिलीट केल्या पाहिजेत ज्याची आपल्याला गरज नाही. यामुळे फोनची जागा रिकामी होते. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे चॅट हटवायचे असतील तर तुम्हाला Ctrl + Alt + Backspace बटण दाबावे लागेल.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

  • जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे नवीन ग्रुप बनवायचा असेल आणि तोही शॉर्टकट बटणाने, तर तुम्ही Ctrl + Alt + Shift + N बटण दाबावे.
  • व्हॉट्सअ‍ॅप वेबवर काम करत असताना तुम्हाला अचानक सेटिंग्ज ऍक्सेस करण्याची गरज भासल्यास, वेळ न घालवता Ctrl + Alt + , (कॉमा) दाबा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp web users must remember these commands all work will be done instantly pvp
First published on: 22-05-2022 at 12:58 IST