फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. दैनंदिन आयुष्यात फोनमुळे अनेक कामे क्षणार्धात होतात. त्यामुळे ‘फोनशिवाय माणूस’ ही कल्पनाही आपण करू शकत नाही. या फोनची विशेष काळजी घेणेही तितकेच खूप गरजेचे आहे. प्रत्येक फोनमध्ये एक बॅटरी असते. ही बॅटरी चार्ज असेल तरच आपला फोन सुरू असतो पण जेव्हा फोन खूप स्लो चार्ज होतो, तेव्हा अनेक कामे बिघडण्याची शक्यता असते. तुम्हाला माहिती आहे का आपला फोन अचानक स्लो चार्ज का होतो? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. तुम्ही चुकीचा चार्जर वापरत आहात का?

चार्जिंग स्लो होण्यामागील सर्वात मोठे कारण हे चुकीचा चार्जर वापरणे होय. जर तुमचा Charger Adapter फास्ट चार्जिंग करणारा नसेल तर तुमचा फोन स्लो चार्ज होणार. त्यामुळे फोनचा चार्जर काळजीपूर्वक निवडावा.

२. चार्जिंग पोर्टमध्ये कचरा आहे का?

जर फोन सतत तुमच्या पॉकेटमध्ये ठेवला तर फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये डस्ट, किंवा कचरा जाण्याची जास्त शक्यता असते आणि फोन चार्ज करताना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फोनचा चार्जिंग पोर्ट नेहमी स्वच्छ ठेवा.

हेही वाचा : WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन! तुम्ही करत नाही ना ही चूक?

३. चार्जिंग Cable, Adapter किंवा Power Outlet चांगले आहेत का?

अनेकदा चार्जिंग केबल खराब झाल्यामुळे चार्जिंगचा स्पीड मंदावतो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा चार्जिंग केबल घ्यावा पण जर तुमच्या फोनचा चार्जिंग केबल चांगला असेल आणि तरीसुद्धा फोन चार्ज खूप स्लो होत असेल तर Adapter सुद्धा तपासावा. अनेकदा Adapter कमी पावरचा असल्यानेही चार्जिंग स्पीड स्लो होते.

४. तुमच्या फोनमध्ये पाणी गेले का ?

जर तुमच्या फोनमध्ये पाणी गेले असेल तर तुमचा फोन स्लो चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये पाणी गेले तर तुमचा चार्जिंग पोर्टसुद्धा ओला होऊ शकतो ज्यामुळे फोन चार्जिंग करताना अडथळा निर्माण होतो.

हेही वाचा : WFH साठी मनमानी चालणार नाही, महिन्यातून १२ दिवस ऑफिसला या अन्यथा…; TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेमो चर्चेत

५. बॅटरी चेक करा

अनेकदा फोन स्लो चार्ज होण्यामागील सर्वात मोठे कारण बॅटरी असते. जर तुमच्या फोनची बॅटरी जुनी किंवा खराब झाली असेल तर चार्ज होण्यास वेळ लागू शकतो. अशा वेळी फोनची बॅटरी बदलणे, हा एक उत्तम पर्याय आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why phone is charging slowly read reasons ndj
First published on: 02-06-2023 at 17:28 IST