TCS Calling Employees To Office: देशातील सर्वात मोठी आयटीकंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसने (TCS) अशा कर्मचाऱ्यांना मेमो (Memo)पाठवायला सुरूवात केली आहे जे महिन्यातून कमीत कमी १२ दिवस ऑफिसमधून काम करत नाही. कंपनीने मेमोमध्ये सांगितले आहे की, नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही (Disciplinary Proceedings) सुरू केली जाईल. ताबडतोब ऑफिसमधून काम करणे सुरू करण्याचा इशारा आणि सुचना मेमोमध्ये दिली आहे

ऑक्टोबरमध्ये कंपनीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मॅनेजरने त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येण्यास सांगितले आणि या नियमांचे त्यांना पालन करावे लागेल.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अनेक कंपन्यांमध्ये आहे ही स्थिती

कोरोना कााळात देश-विदेशी कंपन्यांनी वर्क-फ्रॉम होमची सुविधा दिली होती. करोना रुग्नांच्या संख्येत घट झाल्यानंतर कंपन्यांनी पुन्हा ऑफिस सुरु केले पण बहुतेक कर्माचारी ऑफिसमध्ये जात नाही त्याऐवजी ते घरूनच काम करतात. याबाबत कंपनी मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये ओढाताण सुरू आहे.

हेही वाचा – ”ये दोस्ती हम नहीं तोडेंगे!” सायकल तुटेल पण मैत्री नाही, चिमुकल्यांनी केला भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

कर्मचारी व्हावे व्हायब्रंड इकोसिस्टीमचा भाग

टीसएसने TOIला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कँपसमध्ये उत्साही वातावरण पाहून आम्ही प्रोत्साहित झालो आहोत आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी या व्हायब्रंड इकोसिस्टीमचा भाग व्हावे अशी आमची इच्छा आहे. मागील दोन वर्षात कँम्पसमध्ये मोठ्या संख्येने नवीन कर्मचारी टीसीएसमध्ये सहभागी झाले आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की” त्यांनी टीसीएसच्या सहकार्यांने नवीन गोष्टी शिकाव्या, नवीन अनुभवांनी समृद्ध व्हावे आणि एकत्र काम करण्याची मजा अनुभवावी.”

हेही वाचा – आयपीएलदरम्यान जखमी गुडघ्यावर पट्टी बांधून मैदानात उतरला MS Dhoni, व्हिडिओ होतोय व्हायरल

वर्क फ्रॉम होम कधी करू शकतात

टीसीएस कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करायचे नसेल तर ते पाच दिवस आधी विंनती करू शकतात. एचआर सिस्टीम कोणत्याही जुन्या तारखेच्या वर्क फ्रॉम होमसाठीचा अर्ज स्विकारणार नाही. कंपनीने मेडिकल एमरजन्सीशिवाय वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन दिले जाणार नाही असे सांगितले होते.


करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलविणाऱ्या पहिल्या आयटी सर्व्हिस कंपन्यांपैकी टीसीएस ही एक कंपनी आहे आणि त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणारी ही एकमेव कंपनी आहे.