उसगाव ८४, पेल्हार ९३ तर सूर्या ७५ टक्के भरले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. पेल्हार, पापडखिंड आणि उसगाव तलाव भरून वाहू लागली आहेत तर सुर्या धरण ७५ टक्के भरले आहे. त्यामुळे वसईकरांची पाण्याची समस्या सुटली आहे.

  • सध्या वसईसह पालघर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्य़ात असलेल्या धरणश्रेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.
  • वसई-विरार शहराला पाणीपुरवाठा करणारी पेल्हार आणि उसगाव धरणे पूर्ण भरून वाहू लागली आहेत.
  • गेल्या वर्षी याच दिवशी उसगाव धरण ८४ टक्के, तर पेल्हार धरण ९३% भरले होते.
  • विरारचे पापडखिंड हे छोटे धरणही यापूर्वीच भरले आहे. या धरणातू विरारला एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
  • वसई-विरार शहराला सूर्या धरणातून १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हे सगळ्यात मोठे धरण आहे. हे धरण ७५ टक्के भरले आहे.
  • गेल्या वर्षी ते केवळ ५८ टक्के भरले होते. त्यामुळे वसई-विरार शहराला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.
  • सूर्या टप्पा क्रमांक ३ चे काम प्रगतीपथावर असून त्यामुळे वसई-विरार शहराला आणखी १०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
  • याशिवाय वितरण योजना मंजूर झाली असून त्याद्वारे जलकुंभ आणि नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam full in vasai