अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. त्यांच्या कार्यालयात हे पत्र मिळाल्याची माहिती त्यांच्या स्वीय सचिवांनी दिली आहे. या पत्रामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. डॉ. किणीकर सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात किणीकर यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांना लक्ष करण्यात आले होते. तर यापूर्वी शिवसेनेच्या विविध गटांकडून समाज माध्यमांवर डॉ. किणीकर यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली जात होती. त्यामुळे मंगळवारी अंबरनाथ मधील एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर बुधवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अंबरनाथ येथील कार्यालयात त्यांना एक निनावी पत्र आले. या पत्रात डॉक्टर किणीकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. असे पत्र कार्यालयात आल्याची माहिती डॉ. किणीकर यांचे स्वीय सचिवांनी दिली आहे. या पत्रावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया हे,
हामारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है
इसिलिए तुझे मारनेका हे बता इसलिये रहा हु जब में मारूंगा
वह दिन तय हे तब तक टू रोज डर डर के जिये

असा आशय या पत्रामध्ये लिहिण्यात आला आहे. या पत्रानंतर सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी शिवाजी चौक येथील कार्यालयात पोलिसांनी धाव घेतली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to shiv sena ambernath mla dr balaji kinikar asj
First published on: 29-06-2022 at 18:05 IST